मोहोळ, धुरंधर न्युज
“सर्व कुटुंबाच्या आरोग्याची काळजी करणारी घरातील स्त्री मात्र स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते ही बाब गंभीर असून आता न लाजता न घाबरता स्त्रियांनी आपल्या आजाराविषयी मनमोकळे तज्ञ डॉक्टरांशी बोलणे गरजेचे असून असे केल्यास खऱ्या अर्थाने स्त्रियांचे आरोग्य सदृढ राहील “असे प्रतिपादन डॉ पूजा क्षीरसागर यांनी केले.
मोहोळ तालुक्यातील वडवळ येथील भक्त निवास येथे जागतिक महिला दिनानिमित्त क्षीरसागर होमिओपॅथिक कलिनिक मोहोळ,स्वानंद बहु संस्था वडवळ,श्री नागनाथ देवस्थान पंच कमिटी यांच्या वतीने आयोजित मोफत मूळव्याध तपासणी व औषधोपचार शिबिर प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी गरजू रुग्णाची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार करण्यात आले.
याप्रसंगी देवस्थान पंच कमिटी चे अध्यक्ष श्रीकांत शिवपूजे,सचिव शाहू शिवपूजे,डॉ सूर्यकांत चव्हाण,पोलीस पाटील दादा काकडे,आरोग्यसेविका शितल पाटील, सालेहा आरब,आरोग्यसेवक जयवंत थिटे, स्वानंद संस्थेचे अध्यक्ष रुपेश क्षीरसागर, उपाध्यक्ष किरण कुमारी गायकवाड, खजिनदार अण्णा सुरवसे, सचिव महेश कोटीवाले, प्रतिभा कोटीवाले, गुंडन शिवपूजे, शहाजी गुंड, दयानंद शिवपूजे उपस्थित होते.
अशीही सेवा ..
वडवळ प्राथमिक उपकेंद्राच्या आरोग्य सेविका शितल पाटील या दोन्ही पायाने दिव्यांग असून त्यांनी आजवर आपली सेवा प्रामाणिकपणे बजावली … महिला दिन सप्ताह निमित्त हे शिबिर होते मात्र धुलीवंदन ची सुट्टी असताना देखील त्या त्यांच्या सहकारी सालेहा अरब,जयवंत थिटे यांच्या समवेत या शिबिरात उपस्थित राहून रुग्णसेवा बजावली.