सर्व स्तरातून होतेय कौतुक
पुळुज/धुरंधर न्युज
पुळूज गावातील हॉटेल ताजमहल चे मालक अलताब दादासो मुलाणी यांचा मुलगा अमिन हा इयत्ता पहिलीत शिकत असून त्याचा पहिलाच रोजा प्रथम च केल्यामुळे गावातून त्याची वाहवा केली जात आहे .
एवढ्या लहान वयात रोजा करणे फार अवघड असते. कारण या काळात कोणतेही अन्न पाणी न घेता १२ ते १४ तास उपाशी राहणे फार अवघड असते. तरी एवढा शा छोट्या अमिन ने रोजा केल्या मुळे याचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे. या प्रसंगी गावातील ग्रामस्थांनी त्याचा सत्कार केला.
तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय पांढरे यांनी विषेश कौतुक केलं यावेळी दिलावर मुलांणी, नागनाथ राजमाने, अमर म्हमाने, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.