मानवी समाजाला सुदृढ शरीर काळाची गरज – पो. नि. विनोद घुगे

मोहोळ येथे अत्याधुनिक व्हिजन जिमचा शुभारंभ

मोहोळ /धुरंधर न्युज

उत्तम आरोग्य सांभाळण्यासाठी मानवी शरीराला व्यायामाची गरज असून कोरोनाच्या संकटाने संपूर्ण मानवी समाजालाच सुदृढ शरीराचे महत्त्व जाणून दिले आहे. निरोगी आयुष्य सर्वांसाठीच महत्त्वाचे बनले आहे. याच पार्श्वभूमीवर मोबाईल जगतामध्ये हरवलेली तरुण पिढी व्यायामाकडे वळवण्यासाठी अत्याधुनिक जिम सुरू करण्याचा उपक्रम स्तुत्य व आदर्शवत असल्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी व्यक्त केले.

मोहोळ शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्याधुनिक सोयीने युक्त अशा व्हिजन फिट जिम अँड क्रॉसफिट या जिम सेंटरचे उदघाटन शिक्षण समितीचे माजी सभापती संकेत पिसे व मोहोळचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य अजिंक्यराणा पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डूनगे, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष हेमंत गरड, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, आरपीआयचे हनुमंत कसबे, सागरराजे पांढरे, शकील शेख, गौरव पिसे, अमोल गायकवाड, चंद्रराज काळे, सुरेश आवारे, निलेश देशमुख, प्रतीक कुंभार, हनुमंत टेकाळे, नेमिनाथ पडवळकर, सागर भिसे, अनंत नागनकेरी, श्यामराव नागणकेरी, किरण नागणकेरी, अतिश नागणकेरी, आशिष नागनकेरी,

अमित नागनकेरी, रोहित नागनकेरीआदींसह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *