पंचायत समितीच्या माजी सदस्या डॉ. प्रतिभा अमित व्यवहारे यांची मोहोळ तालुका वैद्यकीय सेल अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून निवडीचे पत्र महिला जिल्हाध्यक्ष धनश्री खटके पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
आष्टी ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष सरपंच डॉ. अमित व्यवहारे यांच्या पत्नी व आष्टी पंचायत समिती गणाच्या माजी सदस्या डॉ. प्रतिभा अमित व्यवहारे यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून परिसरात केलेल्या सामजिक कार्याची दखल घेऊन भाजपाच्या मोहोळ तालुका वैद्यकीय सेल अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र भाजपा महिला जिल्हाध्यक्षा धनश्री खटके यांनी दिले. निवडीनंतर डॉ. व्यवहारे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
यावेळी भाजपा किसान मोर्चा प्रदेश सदस्य नितीन गरदडे, भाजपा माढा तालुका उपाध्यक्ष धनाजी लादे, उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष श्रीकांत लादे, शहराध्यक्ष रविकांत जाधव, महिला शहराध्यक्ष रोहिणी मोहिते, किसान मोर्चा शहराध्यक्ष विशाल पाटील, युवा मोर्चा शहराध्यक्ष समीर गिड्डे, सरपंच डॉ.अमित व्यवहारे, मोडनिंब ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी किरण खडके, माजी सरपंच नवनाथ मोहिते, राजाभाऊ खटके आदी उपस्थित होते.