मोहोळ शहर व तालुक्याची काँग्रेस पक्षाची जंबो कार्यकारिणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी जाहीर केली असून यामध्ये मोहोळ शहर २१ तर तालुका कार्यकारणी मध्ये ५६ असे ७७ जणांना या जंबो कार्यकारिणी मध्ये विविध पदे देऊन काम करण्याची संधी देण्यात आली आहे.
काँग्रेसच्या मोहोळ तालुका अध्यक्षपदी सुरेश शिवपुजे तर शहराध्यक्षपदी किशोर पवार, तर युवक तालुकाध्यक्ष पदी चेतन पाटील यांच्या नियुक्ती नंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी मोहोळ शहर व तालुक्याची जंबो कार्यकारिणी जाहीर केली असून यामध्ये विविध पदावर ७७ कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे.
यामध्ये तालुका वरिष्ठ उपाध्यक्ष पदी सिद्राम पवार, बलभीम भोसले, दाजीसाहेब कोकाटे, शंकर अलकुंटे, नामदेव खांडेकर, महादेव सुरवसे, राम शिंदे, ज्ञानदेव कदम, ज्ञानेश्वर पाटील, रतनबाई सुभाष कसबे, निलेश जरग, उपाध्यक्षपदी रामा कांबळे, रेवनसिद्ध तरंगे, कमलाकर देशमुख, अनिल गवळी, गणेश शेटे, मिथुन पवार, सरचिटणीस पदी शिवाजी काकडे, मऱ्याप्पा व्यवहारे, बसवराज रुद्राक्ष, वासुदेव उकळे, दत्तात्रय सावंत, राम पाटील, राजेंद्र मोटे, आबासाहेब घोलप, लक्ष्मण गजघाटे, सचिवपदी राहुल होनमाने, सुखदेव राऊत, अनिल लोखंडे, संघटक पदी महेश नेटके, भीमराव चंदनशिवे यासह कायम निमंत्रक म्हणून ज्येष्ठ नेते बाबासाहेब तात्या क्षीरसागर व सुभाष अण्णा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यासह मोहोळ शहर कार्यकारणी मध्ये कायम निमंत्रक म्हणून तालुकाध्यक्ष सुरेश शिवपुजे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष शाईन शेख, माजी शहराध्यक्ष ऍड. पोपट कुंभार, वरिष्ठ उपाध्यक्ष पदी अमोल मोरे, हरिभाऊ गायकवाड, ॲड. शमशाद मुलाणी, भीमराव करपे, उपाध्यक्षपदी केरबा गाडवे, सत्यवान जाधव, राहुल कुरडे, सुनील टिळेकर, सरचिटणीसपदी राजन घाडगे, संतोष शिंदे, कल्पना स्वामी, सचिवपदी शकील बागवान, नागेश पवार, संजय जाधव, सदस्यपदी अमजद शेख, कंदीश शेख, विनायक राऊत, संतोष चव्हाण आदींचा समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान या निवडीबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणितीताई शिंदे यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.