मोहोळ तालुक्यातील अंकोली येथील मुख्यमंत्री पेयजल अंतर्गत मंजूर असलेले पाणीपुरवठा चे बेकायदेशीररीत्या काम करुन शासनाची दिशाभुल करुन व नागरीकांचे पिण्याचे पाण्याचे आतोनात हाल करुन बिल हडपण्याचा प्रयत्न तात्काळ थांबवून काम पूर्ण करावे, अन्यथा दि.३० मार्च रोजी अंकोली स्मशानभुमी येथे बेकायदेशीर काम बंद करा व कामाचे बिल काढू नका, या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष पप्पू पाटील यांनी दिला आहे.
याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री पेयजल ही योजना सन २०१८ मध्ये मंजुर असुन त्या योजनेचे काम सन २०१९ पासून सुरू झाले आहे. या कामाची सुरूवात झाल्यापासून काही कारणानिमित्त २०१९ चे सरपंच संदिप तुळशीराम पवार यांनी हे काम निकृष्ठ दर्जाचे आहे म्हणून अडविले होते. त्यानंतर ते काम आजतागायत बंद अवस्थेत होते. मात्र सध्याचे सरपंच यांनी काम चालू करून गेली २० ते २५ वर्ष अंकोली गावामध्ये ३ इंची पाणीपुरवठयाची पाईपलाईन आहे, या जुन्या पाईपलाईनला नवीन पाणीपुरवठा जोडून बेकायदेशीररीत्या काम करुन शासनाची दिशाभुल करुन व नागरीकांचे पिण्याचे पाण्याचे आतोनात हाल करुन बिल हडपण्याचा प्रयत्न आहे. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातुन दि.३० मार्च रोजी अंकोली स्मशानभुमी येथे बेकायदेशीर काम बंद करा व कामाचे बिल काढू नका, या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष पप्पू पाटील यांनी म्हटले आहे.