महावितरण चा पुन्हा अनागोंदी कारभार उजेडात,

ए.सी.त बसून अनागोंदी कारभार करणाऱ्या मोहोळ महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्याच कारभाराचे वाभाडे जग जाहीर केले असून दशरथ काळे यांनी मागितलेल्या माहितीच्या अधिकारात चुकीची दिशाभूल करणारी माहिती दिली असुन समंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून त्यांची खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी क्रांतीवीर भगतसिंग प्रतिष्ठान चे अध्यक्ष तथा मोहोळ तालुका माजी भाजपा अध्यक्ष दशरथ काळे यांनी महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांच्या एका निवेदनाद्वारे केली आहे.

सामाजिक कार्यकर्ते दशरथ वसंत काळे यांनी माहिती अधिकारात बचत गटाने आणि महावितरण कंपनी याने संकलीत केलेल्या विज बिलाच्या रक्कमेच्या तपशील बाबत मोहोळ महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालय  यांच्या कडे दि. ३१ जानेवारी रोजी अर्ज दिला होता. या व्यतिरिक्त काळे यांनी संबंधित विभागाकडे  शेतीपंपाच्या विजकनेक्शन संदर्भात अथवा धरणे आंदोलना बाबतीत कोणतेही पत्र दिले नसताना आपण आमच्याकडे शेतीपंपाला दिलेल्या वीज जोडणी बाबत प्रस्ताव आमच्या कार्यालयाकडे उपलब्ध झाला असून सदरचा प्रस्ताव आम्ही सोलापूर ग्रामीण विभागाकडे पाठविला आहे . तसेच आपल्या शेतीपंपाच्या जोडणीचा प्रस्ताव हा २०२०-२१ या योजनेअंतर्गत मंजूर देखील केला आहे,तरी आपण आपली दि. २३ /०२/ २०२२ रोजीचे प्रस्तावित धरणे आंदोलन रद्द करावे, असे दिशाभूल करणारे पत्र काळे यांना महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोस्टाने पाठविले पाठवून दिले आहे .उल्लेखनीय बाब म्हणजे  काळे यांनी माहिती अधिकारात माहिती हि व्यक्तीशा मिळावी म्हणून नमूद केले असतानाही त्यांना संबंधित माहिती अधिकाराचे दिशाभूल करणारे उत्तर टपालाद्वारे पाठवले आहे. पत्रावरूनच मोहोळ महावितरण कार्यालयात कसा अनागोंदी कारभार  चालतोय याचे चित्रच जनतेसमोर आले असून या प्रकरणाची  चौकशी करून संबंधित अधिकारी यांच्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणीही दशरथ काळे यांनी अधीक्षक अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ज्यांची तक्रार आहे त्या नागरिकांना व्यवस्थित बोलण्याऐवजी मोहोळ महावितरणचे अधिकारी त्यांना दिशाभूल करणारी उत्तरे देण्याचे काम करत आहेत.याची तात्काळ चौकशी करावी व संबंधित अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करावी. अन्यथा यापुढील काळात महावितरणच्या विरोधात आंदोलनाचा इशाराही दशरथ काळे यांनी दिला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *