विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांची प्रमुख उपस्थिती
मोहोळ :
माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. महेश भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांच्या शुभहस्ते त्यांचा भव्य नागरी सत्कार दि.२६ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे.
माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. महेश भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२६ मार्च रोजी राजमुद्रानगर चिंचोली काटी येथे जिल्हाप्रमुख गणेश दादा वानकर यांच्या हस्ते होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये मोहोळ तालुक्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. यामध्ये माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दीपक गायकवाड, माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, विधानसभा संघटक काकासाहेब देशमुख, उपजिल्हाप्रमुख दादासाहेब पवार, तालुकाप्रमुख अशोक भोसले, युवा सेना जिल्हाप्रमुख महेश देशमुख, जिल्हा संघटक नागेश वनकळसे, माजी नगरसेविका सीमाताई पाटील, शिवसेना नेते सोमेश क्षीरसागर, अतुलराजे भवर, विक्रांत काकडे, शहाजी भोसले, मुकुंद आवताडे, लखन शिंदे, राजरत्न गायकवाड, अभय देशमुख, सचिन जाधव, बाळासाहेब वाघमोडे, हर्षल देशमुख, सोमनाथ पवार, रणजीत गायकवाड, सुरज जम्मा यांच्यासह युवती सेना जिल्हाप्रमुख पूजाताई खंदारे, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख प्रियाताई बसवंती, महिला तालुकाप्रमुख ज्योतीताई नागणे, तालुकाप्रमुख अनिताताई भोसले, पंचायत समिती सदस्य सुनीता भोसले, युवती सेना मोहोळ तालुकाध्यक्ष अमृता उन्हाळे, सुनीताताई सोनार, संगीताताई टेकाळे, राणीताई गोडसे, सीमाताई बोंगे, अनिता सोनटक्के आदिंची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
यासह या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, मोफत ई-श्रम कार्ड वाटप, पंतप्रधान उज्वला योजनेअंतर्गत २५ मोफत गॅस कनेक्शन वाटप, सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा-चिंचोली (काटी) ग्राहक सेवा केंद्राचे उदघाटन, ग्रामपंचायत चिंचोली काटी मधील गावअंतर्गत रस्त्यांचे भुमिपुजन, राजमुद्रा गॅस एजन्सी या ४ या वर्धापन दिन सोहळा, कॉमन सर्व्हिस सेंटर उदघाटन, वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकिय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी शिबीर आदी सामाजिक उपक्रमाचे आयोजन याप्रसंगी करण्यात आले आहे.