सिल्वर ओक वर झालेल्या हल्ल्याचा मोहोळ तालुका राष्ट्रवादी ने केला निषेध
सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारे, सर्वच क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान असणाऱ्या महान व्यक्तिमत्व असणाऱ्या खासदार शरद पवार यांच्यावर एसटी कर्मचाऱ्यांच्या नावाखाली जातीयता व समाजामध्ये भेद पाडणाऱ्या समाजकंटकांनी केलेला हल्ला निंदनीय असल्याचे प्रतिपादन मोहोळ चे आमदार यशवंत माने यांनी केले.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते देशाचे माजी कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार यशवंत माने यांच्या नेतृत्वाखाली आणि पं.स.अजिंक्यराणा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी आ. माने बोलत होते. यावेळी मोहोळचे तहसीलदार प्रशांत बेडसे – पाटील यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, दुध संघाचे व्हा.चेअरमन दीपक माळी, महिला तालुका अध्यक्षा सिंधुताई वाघमारे, जि प सदस्य शिवाजी सोनवणे, भारत सुतकर, सरचिटणीस प्रशांत बचुटे, शहर महिला अध्यक्ष यशोदा कांबळे, रत्नमाला पोतदार, नागेश साठे, शुक्राचार्य कोल्हाळ, रामदास चवरे, विजय कोकाटे, जालिंदर भाऊ लांडे शहराध्यक्ष कुंदन धोत्रे, माजी सभापती रत्नमाला पोतदार, अध्यक्ष अविना राठोड कल्पना खंदारे, प्रमोद बापू डोके, सुरेश गाढवे, संतोष खंदारे, हेमंत गरड, धनाजी गावडे, राजू आढेगावकर, मदन पाटील, दत्तात्रय पवार, गोविंद पाटील, अतुल गावडे, अझरूद्दीन शेख, मुस्ताक शेख, अमोल कादे, नागेश बिराजदार, अमित वागज, शकील शेख, बाबा आठवले, दत्ता खवळे, गौतम शिरसागर, जयवंत गुंड, दादा ओहोळ, मुकेश बचुटे, दर्शन शेटे, लखन कोळी, बालाजी नरुटे, अमर आतकरे, धनाजी गोडसे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक,सर्व नगरसेवक सह राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.