मोहोळ शहरातील साठे नगर भागातील एका दुकानात अवैध्यरित्या गुटक्याची विक्री करण्यासाठी साठा करणाऱ्या दुकानावर कारवाई करीत मोहोळ पोलीसांनी ३ लाख १२ हजार किमंतीचा गुटखा जप्त करण्यात आल्याची घटना दि. ६ एप्रील रोजी रात्री घडली. तर वाळूसह टेम्पो असा ७ लाख ८ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील साठे नगर भागामध्ये एका दुकानांमध्ये गुटख्याचा साठा करून ठेवल्याची माहीती मोहोळ पोलीसांना मिळताच पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, डीबी पथकाचे शरद डावरे, अमोल गुळवे, पांडुरंग जगताप, हरीश थोरात यांच्या पथकाने धाड टाकली असता आर. एम डी, सुगंधित तंबाखू, रजनीगंधा पान मसाला, रत्ना सुगंधित तंबाखू अशा प्रकारचा ३ लाख १२ हाजार रुपयाचा मुद्देमाल मोहोळ पोलिसांना मिळून आला. या प्रकरणी अन्न आणि भेसळ निरीक्षक कुचेकर यांनी राजकुमार शिवशंकर कुर्डे रा. साठेनगर मोहोळ याचे वर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद डावरे, जगताप, हरीश थोरात हे खाजगी वाहनाने मोहोळ हद्दीमध्ये वडवळ भागात पेट्रोलिंग करीत असताना आष्टे गावात पुलाजवळ आले असता तेथे एक इसम टेम्पो मध्ये वाळू घेऊन जात असताना दिसला त्याचा संशय आल्याने त्याला थांबवले असता तो टेम्पो रोडच्या कडेला थांबून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. पळून गेलेल्या चालकाबाबत चौकशी केली असता त्याचे नाव आकाश पवार असल्याचे समजले सदर टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये वाळू भरलेली दिसली सदर टेम्पो मध्ये १ब्रास वाळू व एक हिरव्या रंगाचा टेम्पो नंबर एम एच १४ एफ २९४१ असा एकुण सात लाख आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल हरिदास थोरात यांनी दिली असून पुढील तपास ए एस आय युसुफ शेख हे करीत आहेत.