मोहोळ तालुक्यातील अपघातात पोलिसांसह दोन सख्खे भाऊ ठार, चार जण जखमी

दोन सख्खे भाऊ ठार, तर चार जखमी-

पंढरपूर हुन देवदर्शन करून सोलापूर कडे निघालेली ओमनी कार धोकादायक स्थितीत पंढरपूर मोहोळ रस्त्यावर सारोळे पाटी नजीक उभारलेल्या एका ट्रकवर आदळून झालेल्या अपघातामध्ये दोन जण भाऊ जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि.४ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास सारोळे पाटीजवळ घडली.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूर मुख्यालयामध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून ड्युटीवर असणारे दयानंद अण्णाराव बेल्लाळे हे आपल्या परिवारासह ओमनी कार क्रमांक एम एच १२ एन इ ४४८७ मधून पंढरपूर येथे देव दर्शनाला गेले होते. दरम्यान देवदर्शन आटोपून सोलापूरकडे परत येत असताना पंढरपूर मोहोळ रस्त्यावर सारोळे पाटी नजीक धोकादायक स्थितीत रस्त्यावर उभा असलेला ट्रक क्रमांक एम एच १२ एफ झेड ७३७७ यावरती पाठीमागून जोरात आढळून झालेल्या अपघातात दयानंद अण्णाराव बेल्लाळे (वय ३०), सचिन आण्णाराव बेल्लाळे (वय ३२,) रा. रोकडा सावरगड ता. अहमदपूर जि. लातूर हे दोन जण भाऊ जागीच ठार झाले, तर स्वाती उर्फ राणी सचिन बेल्लाळे, (वय २८), दिपाली उर्फ जयश्री दयानंद बेल्लाळे (वय २५), त्रेशा दयानंद बेल्लाळे, (वय ८), श्लोक सचिन बेल्लाळे (वय १) हे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान अपघाताची खबर मिळताच पोलिसांनी तातडीने जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील खासगी रुग्णालयांमध्ये पाठवून देण्यात आले.

https://youtu.be/UcFpMTavJJE
व्हिडीओ पहा..

याबाबत ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक फौजदार अविनाश शिंदे हे करीत आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी घटनास्थळी भेट दिली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *