भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कुरुलचे बाबासाहेब जाधव यांची नियुक्ती

पक्षाने दिलेल्या पदाचा उपयोग सर्वसामान्यांच्या सेवेसाठीच करणार: बाबासाहेब जाधव

कुरुल, प्रतिनिधी (नानासाहेब ननवरे)

भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कुरुल येथील बाबासाहेब जाधव निवड करण्यात आली असून भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, आ. समाधान आवताडे, आ. प्रशांत परिचारक यांच्या हस्ते जाधव यांना नियुक्ती चे पत्र देण्यात आले.

मोहोळ तालुक्यातील कुरूल परिसरात सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत असणारे बाबासाहेब जाधव यांच्या कार्याची दखल घेत भारतीय जनता पार्टीने त्यांना जिल्हा उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली असून पंढरपूर येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, आ. समाधान आवताडे, आ. प्रशांत परिचारक यांच्या हस्ते जाधव यांना नियुक्ती चे पत्र देण्यात आले.
पक्षश्रेष्ठींचा आदेशाप्रमाणे भारतीय जनता पार्टीची विचारधारा तळागाळातील लोकांपर्यंत पोहचुन मला मिळालेल्या पदाचा उपयोग जनतेच्या सेवेसाठी व समस्या सोडविण्यासाठी व सरकारच्या विविध शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळवून देत पक्ष वाढीसाठी सतत प्रयत्न करणार असल्याचे नुतन जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव यांनी बोलताना सांगितले.

यावेळी मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सुनिल चव्हाण, दिनकर मोरे पांडूरंग शुगरचे उपाध्यक्ष कैलास खुळे, भास्कर कासवाडे, लक्षण पापरकर, प्रा,चांगदेव कांबळे, माऊली हळणवर आदीसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *