गणेश मोरे यांच्या हस्ते घेतला पदभार .
मोहोळ पंचायत समितीच्या नूतन गट विकास अधिकारी पदी आनंदकुमार मिरगणे यांनी नियुक्ती झाली असून उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदोन्नतीने बदली झालेले गणेश मोरे यांच्या हस्ते त्यांनी पदभार स्वीकारला.
मोहोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश मोरे त्यांची नुकतीच धुळेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदोन्नती ने बदली झाली होती. याच पार्श्वभूमीवर देवणी जि. लातूर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे यांची मोहोळ पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. गणेश मोरे यांनी दि. ३१ मे रोजी नूतन गटविकास अधिकारी पदी आनंदकुमार मिरगणे यांना पदभार दिला. सन २०१५ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आनंदकुमार मिरगणे यांची निवड होऊन नागपूर येथे वनामती येथे प्रशिक्षण पूर्ण केले. तदनंतर उस्मानाबाद जिल्हा परिषद मध्ये प्रशिक्षण तर लोणार जि. बुलढाणा येथे परिविक्षाअधीन सहाय्यक गट विकास अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. दरम्यान आटपाडी पंचायत समितीमध्ये त्यांची पहिल्यांदा सहाय्यक गट विकास अधिकारी म्हणून तर जिल्हा परिषद जालना येथे नरेगाच्या गटविकास अधिकारी पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आतापर्यंत चे सर्वात तरुण गट विकास अधिकारी म्हणून मिरगणे यांनी मोहोळ पंचायत समिती ची सूत्रे स्वीकारली आहेत.
यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीनिवास पदमावार, सहाय्यक प्रशासन अधिकारी शशिकांत नरगिडे, विस्तारअधिकारी कुंडलिक गावडे, विस्तार अधिकारी नंदकिशोर बागवाले, विस्तार अधिकारी संदीप खरबस, लिपिक रामभाऊ होनमाने, संदीप कोळी, युवराज सूर्यवंशी, रामदास सातपुते, साखरे, कुरडे, माने, मारडकर, आदींसह पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.