पेनुर येथील चार शेतरस्त्यांचे केले मुरमीकरण 

चरणराज चवरे हे पेनूर जिल्हा परिषद निवडणूक पूर्ण ताकतीने लढविणार

ग्रा. पं. सदस्य चरणराज चवरे यांची माहिती

ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांचा शेतमाल वाहतूक करण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन पेनुर ग्रामपंचायतीच्या वतीने पेनुर गावातील तामडाग परिसरातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चार शेतरस्त्यांचे मुरमीकरण केल्याची माहिती शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य चरणराज चवरे यांनी दिली.

सध्या पावसाळा सुरू असून पेनुर गावातील शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी अडचणी असणाऱ्या शेत रस्त्यांचे काम पेनुर ग्रामपंचायत च्या वतीने हाती घेण्यात आले असून यामध्ये तामडाग परिसरातील गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणारे येवती रोड ते गंगाधर अण्णा चवरे वस्ती ९०० मीटर, तामडाग रोड ते महेश चवरे वस्ती १२०० मीटर, पेनूर- येवती रोड ते मोहन चवरे वस्ती ८०० मीटर व बनाचा ओढा येथे राऊत वस्ती ६०० मीटर या चार रस्त्यांचे मुरमीकरण केले असून भविष्यात नागरिकांना वाहतुकीसाठी अडचणी येणाऱ्या सर्वच शेत रस्त्यांचे काम करण्यासाठी पाठपुरावा करत असून ते लवकरच होईल, असेही यावेळी ग्रामपंचायत सदस्य चरणराज चवरे यांनी सांगितले.

दरम्यान येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीबाबत बोलताना चरणराज चवरे म्हणाले की, एक सामान्य कुटुंबातील विहिरीवर मजूर म्हणून काम करीत सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राजकारण व समाजकारणात सक्रिय झालो असून नागरिकांच्या प्रेमामुळेच शिवसेना तालुकाप्रमुख ते गावातील ग्रामपंचायत पॅनल व ग्रामपंचायत सदस्य असा प्रवास केला आहे. आमचे नेते तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या माध्यमातून दांडगा जनसंपर्क असून स्वखर्चातून रस्ते, मोफत पाणी, कोरोना काळात सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्यामुळे सर्वसाधारण झालेल्या पेनुर जिल्हा परिषद गटामधून निवडणूक लढवणार असल्याचेही यावेळी चरणराज चवरे यांनी सांगितले.

https://youtu.be/ugpfqbgwdqQ

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *