
वेळीच सावध व्हा, अन्यथा नंतर पश्चाताप होईल
ज्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो, त्या पक्षश्रेष्ठींचे सुद्धा या भागात फारसे लक्ष नाही, राजन पाटील असो किंवा मी गेल्या ४० वर्षांपासून एकनिष्ठेने काम करतो आहे, असे असतानाही कोणत्यातरी दुसऱ्या माणसाला मदत मिळत असेल तर हे बरोबर नाही, याच्यातून काहीतरी तिसरे निर्माण होईल, आणि मग त्यांना पश्चाताप होईल, आपली चूक झाली आहे, स्वतःच्या पक्षात त्रास होत असेल तर पक्ष सोडण्याचा विचार मनात काय येऊ नये, म्हणून यामुळे पक्षश्रेष्ठींनी वेळीच सावध व्हावे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी केले.
अनगर येथे लोकनेते कै. बाबुराव अण्णा पाटील यांच्या जयंतीनिमीत्ताने राष्ट्रवादी काँगेस पार्टी मोहोळ तालुका यांच्यावतीने आयोजित मोहोळ तालुक्यातील वि.का.से.सो. नुतन चेअरमन व व्हा. चेअरमन यांचा भव्य सत्कार समारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या अध्यक्षतेखाली माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्या शुभहस्ते व माजी आमदार राजन पाटील व आमदार यशवंत माने, बाळराजे पाटील, अजिंक्यराणा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे बोलत होते.

यावेळी बोलताना आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की, मोहोळ तालुक्यात विकास सोसायट्याचे काम माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले व संस्था सुस्थितीत असून यांच्या बँकेत ठेवी आहेत. राष्ट्रीयकृत बँकेपेक्षा जिल्हा मध्यवर्ती बँकेची सेवा उत्तम असून येथे चेहरा पाहून कर्ज दिले जात नसल्याचे सांगून पाणी योजनेसाठी पाणी उपलब्ध करणे आवश्यक असते, यासाठी वाफळे भागासाठी पाणी उपलब्धतेचा आदेश मंजूर झाला असून हे काम लवकरच टप्प्याटप्प्यात पूर्ण होईल, असेही आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले.
माजी आमदार राजन पाटील बोलताना म्हणाले की, जे सरकार करू शकत नाही, ते सहकार करू शकते याच धर्तीवर बाबुराव अण्णा पाटील यांनी तालुक्यात विविध संस्था उभा करून सहकाराच्या माध्यमातून क्रांती करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी राजकारणापेक्षा समाजकारणावर भर दिला. गरीब उपेक्षित दलित यांना केंद्रबिंदू समजून काम केले. त्यांच्या काळापासून आलेले कार्यकर्ते आजही तिसऱ्या पिढीसोबत आमच्याबरोबर असल्याचेही यावेळी माजी आमदार राजन पाटील यांनी सांगितले.

यावेळी आमदार यशवंत माने म्हणाले की, तालुक्यातील निवडणूक झालेल्या ११५ सोसायटी पैकी माजी आमदार राजन पाटील विचाराच्या १०९ संस्था आल्या असून सहकारामध्ये संस्था कशा टिकवायच्या हे माजी आमदार राजन पाटील यांच्याकडून शिकले पाहिजे, कारण पक्षश्रेष्ठींकडे मला राजकारणात काही देऊ नका, मात्र माझ्या वाफळे भागाला व सिना-भोगावती जोडकालासाठी मंजुरी द्या, अशी मागणी केल्याचा मी साक्षीदार असल्याचे सांगून राजकारणामध्ये एखाद्याला पीएचडी करायची असेल तर त्यांनी अनगरसह बारा वाड्यावर केली पाहिजे, असेही यावेळी आमदार यशवंत माने यांनी सांगितले.

तर यावेळी बाळराजे पाटील यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरील प्रशासक उठवण्यासाठी व तालुक्यातील सोसायटी सचिवांच्या रखडलेल्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती व्यासपीठावरील मान्यवरांना केली.
यावेळी ज्येष्ठ नेते शहाजहान शेख, तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, जिल्हा दूध संघाचे संचालक दीपक माळी, राजाभाऊ गुंड पाटील, शिवाजी सोनवणे, सज्जन पाटील, सतीश भोसले, सिंधुताई वाघमारे, रत्नमाला पोतदार, यशोदाताई कांबळे, अविना राठोड, अस्लम चौधरी, जालिंदर लांडे, दत्तात्रय पवार, मदनसिंह पाटील, अक्षय खताळ, अनंत नागनकेरी, भारत सुतकर, रामदास चवरे, सागर चवरे, प्रमोद डोके, सज्जन चवरे, शिवाजीराव चव्हाण, आनंद गावडे, राहुल मोरे, अनिल कादे, विजय कोकाटे, सचिन चवरे, मुकेश बचुटे, अझरुद्दीन शेख, हेमंत गरड, गौतम क्षीरसागर, मुस्ताक शेख, भारत जाधव, रामचंद्र शेळके, दत्तात्रय काकडे, धनाजी गावडे, राजाभाऊ सुतार, शौकत तलफदार, शकील शेख, जावेद बागवान, साहेबराव निंबाळकर, राजाराम माने, दयानंद राऊत, भाऊसाहेब सलगर, प्रकाश कस्तुरे, तुकाराम पाटील, प्रवीण डोके, रवींद्र देशमुख, रामराजे कदम, श्रीपाल वसेकर, अभय गायकवाड, शिवाजी भोसले, अमर चव्हाण, बालाजी नरुटे, संतोष शेम्बडे, संतोष चव्हाण आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर बळीराम साठे यांना पत्रकारांनी राजन पाटील व आमदार बबनराव शिंदे यांच्या भाजपा प्रवेशा संदर्भात विचारले असता, या तालुक्यात राजन पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली जाते, हे एका पक्षात असून असे बरोबर नाही, यावर पक्षश्रेष्ठींनी विचार करावा तसेच पत्रकारांनी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्या डोक्यावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हात आहे का? असे विचारताच बळीराम साठे म्हणाले की, असणारच त्यात काय झाकून ठेवायचे आहे, पक्षश्रेष्ठींनी यासंदर्भात वेळीच लक्ष न दिल्यास राजन पाटील व बबनराव शिंदे यांना दुसरा काय पर्याय आहे, असेही ते म्हणाले.