सोलापूर/धुरंधरन्युज
आस्था फाऊंडेशन आस्था रोटी बँक सोलापूर यांच्या वतीने समाजातील कृत्त्तवान महिलांचा महिलारत्न पुरस्कार देऊन साजरा करण्यात आला.
हया कार्यक्रमासाठी अध्यक्षा मीनाताई गायकवाड, उषाताई सुरेश पाटील,अँड नीता मंकणी मॅडम, सुनिता भस्मे, बाळासाहेब वाघमारे,राजाभाऊ हौशेट्टी, ब्रह्मा निकंबे हे प्रमुख पाहुणे च्या हस्ते प्रथम क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीप प्रज्वलन केले
मान्यवरांचे सत्कार समारंभ झाले नंतरप्रमुख नंतर डॉ मीना गायकवाड यांचे भाषण झाले व सुनीता भस्मे यांचेही भाषण झाले. त्यावेळी अध्यक्ष डॉ मीना गायकवाड मॅडम यांनी आपल्या मनोगतात म्हणाल्या १९४३ पासून भारतात महिला दिन साजरा करण्यात येऊ लागला भारतातील पहिली स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज मी येथे बोलू शकत आहे व तुम्ही इथे आहात आपण मोकळे श्वास घेऊ शकत आहेत स्त्रीमुक्तीचे जाहीरनामाच्या तयार केला त्यावेळी जर ते मान्य केला गेला नाही तरी हळूहळू त्यातील सर्व कायदा पारित करण्यात आले आस्था फाउंडेशनच्या माध्यमातून आस्था रोटी बँक चालवली जात त्यातून दररोज गरजू लोकांना जेवण पुरवले जाते या कार्याची नोंद गिरणीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेतले जावे असे मत त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले सर्व या आस्था रोटी बँकेच्या कार्यकारिणीच्या कामाचे कौतुक केले व समाजातील लोकांना आवाहन करून आस्था रोटी बँकेला मदत करण्याचे आव्हान केले.
सुनिता भस्मे यांनी आपल्या भाषणात आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की समाजामध्ये असेही संस्था आहे की जे तळागाळातील लोकांना मदत करते व त्यांच्या आणि अर्चना वेळी धावून जाणारी संस्था म्हणजे आस्था फाउंडेशन आस्था रोटी बँक.
आस्था फाऊंडेशन चे मार्गदर्शक श्री.राजाभाऊ हौशेट्टी ,श्री. विजय छंचुरे, निलिमा हिरेमठ, कांचना हिरेमठ , छाया गंगणे, स्नेहा वनकुद्रे, स्नेहा मेहता, पुष्कर पुकाळे, ज्योत्स्ना सोलापूरकर, मंगल पांढरे, विद्या माने, रेणुका कांबळे, अनिता तालीकोटी, सुरेखा पाटील, नीता संगीता छंचुरे, अनिल तालीकोटी,हे सर्वजण उपस्थितीत होते.
सोलापूर मधील निराधार आश्रम , अंध, अपंग, व निराधार आजीबरोबर विविध खेळाचे आयोजित करण्यात आले होते त्यावेळी आजींना बक्षीस म्हणून स्टील डबा व पाण्याची बॉटल देण्यात आले आहे. बादलीत बॉल, एकमेका आजींना टिकली लावणी, अशा अनेक विविध गेम्स खेळण्यात आले आहे.
सोलापुरातील ४ कर्तव्य दक्ष महिलांचा सत्कार करण्यात आला, सुवर्णा काळे, सुनिता गडदे, रेणुका जाधव, मधुरा कुरुलकर या चार महिलांचे महिला रत्न पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले आहे.
सूत्रसंचालन प्रवीण हटकर व ज्योत्स्ना सोलापूरकर केले तर आभार प्रदर्शन पुष्कर पु काळे यांनी केले