मंगळवेढा उपसा सिंचन योजना मार्गी लावण्या साठी अभिजीत पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकांसाठी मागितला भरघोस निधी

उपसा सिंचन योजनेची जबाबदारी घेतली अभिजीत पाटील यांनी खांद्यावर

पंढरपूर/धुरंदर न्युज

मंगळवेढ्यातील 35 गावच्या उपसा सिंचन योजना गेले अनेक वर्षांपासून शासनस्तरावर प्रलंबित आहे. पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्याच्या मागण्यांसाठी श्री विठ्ठल सहकरी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी दि.३१ ऑगस्ट२०२३ रोजी मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृह येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री.अजितदादा पवार यांना भेटून उपसा सिंचन तात्काळ मार्गी लावण्याची विनंती केली तसेच मंगळवेढातील महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी निधी मागणीचे निवेदन ही दिले आहे.

मंगळवेढातील ३५ गावांपैकी २४ गावांची उपसा सिंचन योजना अंतिम टप्प्यात असून उर्वरित गावे तांत्रिक बाबींमुळे शासनाच्या लाल फितीत अडकल्या असल्याने उपसा सिंचन योजनातील त्रुटी पूर्ण करून अर्थमंत्री या नात्याने उपसा सिंचन योजनेसाठी भरघोस निधी मंजूर करावा अशी मागणी अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली.

तसेच स्व.आमदार भारतनाना भालके यांनी उपसा सिंचन योजनेसाठी प्रयत्न केले होते. ही योजना मार्गी लावून स्व. भारतनाना भालके यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची विनंती अभिजीत पाटील यांनी व्यक्त केली.

तसेच मंगळवेढा ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. महात्मा बसवेश्वर हे समस्त महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वसामान्यांचे व लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान आहेत. मंगळवेढा येथे ३१वर्ष महात्मा बसवेश्वरांचे वास्तव असून मंगळवेढा भूमी पावन आहे. महात्मा बसवेश्वर स्मारकांसाठी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात अर्थसंकल्पात स्मारकाची घोषणा झाली असून अद्याप स्मारकास निधी उपलब्ध झालेला नाही. तरी त्वरित निधी उपलब्ध करून प्रत्यक्ष कामास सुरुवात व्हावी, अशी देखील मागणी केली आहे.

यावेळी गेले अनेक वर्ष पाणी प्रश्नांसाठी अविरत लढा देणारे पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री.पांडुरंग चौगुले, मा.सरपंच श्री.अर्जुन खांडेकर, श्री. भिमराव मोरेसर पाटकळ, श्री.पांडुरंग जावळे हे ही सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे उपस्थित होते..

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *