कॅबिनेट मंत्री डॉ. तानाजीराव सावंत हे सोमवारी पेनुर व मोहोळ दौऱ्यावर

राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते सोमवार दि. ५ सप्टेंबर रोजी मोहोळ तालुक्यातील पेनुर व मोहोळ शहर येथे भेट देणार आहेत.

महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत हे सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते सोमवारी दुपारी प्रथम मोहोळ तालुक्यातील पेनुर येथे ग्रामपंचायत कार्यालय येथे भेट देणार आहेत. या ठिकाणी नूतन जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होणार असून परिसरातील नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेणार आहेत. यासह मोहोळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करणार आहेत.

तर मोहोळ विधानसभा मतदार संघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे मोहोळ तालुका प्रमुख प्रशांत भोसले यांच्या माध्यमातून मोहोळ येथे शिवसेनेचे संपर्क कार्यालयाचा उदघाटन सोहळा राज्याचे आरोग्यमंत्री प्रा.डॉ.ना. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते तर प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. यावेळी आ.शहाजी पाटील, जिल्हाप्रमुख चरणराज चवरे, मनीष काळजे, अमोल शिंदे, मनोज शेजवाल, तुकाराम मस्के हे उपस्थित राहणार आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *