
मोहोळ तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मोहोळ तालुक्यातील तमाम शिवसैनिकांना व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रविवार, दि.१६ ऑक्टोबर रोजी मोहोळ येथे भव्य स्मशाल रॅली चे आयोजन केल्याची माहिती उपजिल्हाप्रमुख दादासाहेब पवार व तालुकाप्रमुख अशोक भोसले यांनी दिली.

दि.१६ ऑक्टोबर रविवारी मोहोळ येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने होणाऱ्या स्मशाल रॅली प्रसंगी संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, ज्येष्ठ नेते दीपक गायकवाड, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सीमाताई पाटील, मोहोळ तालुका संघटक काकासाहेब देशमुख, माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, युवती जिल्हाप्रमुख पूजा खंदारे, मोहोळ शहर प्रमुख विक्रांत देशमुख, महिला आघाडी तालुकाप्रमुख ज्योती नागणे, युवासेना जिल्हाप्रमुख महेश देशमुख, युवा सेना तालुका प्रमुख राजरत्न गायकवाड, शिवसेना माथाडी कामगार सेना जिल्हाध्यक्ष कयूम शेख, प्रा. महेश भोसले, वाहतूक सेना तालुका प्रमुख सोमनाथ पवार, सत्यवान देशमुख, महादेव गोडसे, आबा आडगे, चंद्रकांत गोडसे, सिकंदर बोगे, बाळासाहेब वाघमोडे,संदीप चवरे, समाधान खंदारे, दिलीप टेकाळे, विनोद आंमरे, भीमराव मुळे, संतोष चव्हाण, लहू पाटील, प्रकाश पारवे, प्रभाकर हावळे, मनोज नागणे, भागवत मुळे, लींगराज होणमाने, सिद्धेश्वर म्हम्हाणे, भाऊ कदम, डॉ. झेंडगे, सौदागर साठे, सागर गायकवाड, दिलीप मोटे, दिपक शिरसाट, मुकुंद अवताडे, मानसिंग अवताडे, अरुण तांबिले आदिंसह शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती उपजिल्हाप्रमुख दादासाहेब पवार व तालुकाप्रमुख अशोक भोसले यांनी दिली.