मोहोळमध्ये १० प्रभागांमध्ये २० तर अनगर मध्ये १७ प्रभागामध्ये १७ नगरसेवक
बहुचर्चीत असलेल्या मोहोळ नगरपरिषदेची २०२२ च्या निवडणुकीच्या अनुषंगाने नगरसेवकांच्या पदासाठी आरक्षण सोडत दि.१३ रोजी दुपारी १ वा. निवडणुक नियंत्रन अधिकारी हेमंत निकम, मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके यांच्या उपस्थितीत नगर परिषदेच्या सभागृहात पार पडली. तर नव्यानेच स्थापन झालेल्या अनगर नगरपंचायतीच्या १७ नगरसेवकांच्या पदासाठी आरक्षण सोडत नियंत्रण अधिकारी मच्छिंद्र घोलप व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अनुप अग्रवाल यांच्या उपस्थितीत दि.१३ जून रोजी पार पडली. यामध्ये ८ जागा सर्वसाधारण महिला, १ जागा अनुसूचित महिला, १ अनुसूचित सर्वसाधारण व ७ जागा सर्वसाधारण झाल्या आहेत.
मोहोळ नगरपरिषदेचे यावेळी एकुण १० प्रभागापैकी लोकसंखेच्या तुलनेत अनुसुचित जातीची अधिक संख्या असणाऱ्या प्रभाग क्र २, ४, व ५ या तीन प्रभागात चिठ्ठीव्दारे आरक्षण काढण्यात आले. या मधे प्रभाग क्र २ व प्रभाग क्र ४ या दोन जागा अनुसुचित माहिलासाठी राखीव झाल्या. तर प्रभाग क्रमांक ५ मधील १ जागा अनुसुचित सर्वसाधारण निघाली. तर उर्वरीत सर्व प्रभागामधे १ जागा सर्वसाधारण महिला राखीव व १ जागा सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर झाले आहे.
मोहोळ नगर परिषदेसाठी आरक्षण प्रभाग १- अ)सर्वसाधारण महिला, ब) सर्वसाधारण. प्रभाग २- अ) अनुसूचित महिला, ब) सर्वसधारण. प्रभाग ३- अ) सर्वसाधारण महिला, ब) सर्वसाधारण. प्रभाग ४- अ) अनुसूचित महिला, ब) सर्वसाधारण. प्रभाग ५- अ) सर्वसाधारण महिला, ब) अनुसूचित जाती सर्वसाधारण.
प्रभाग ६ – अ) सर्वसाधारण महिला, ब) सर्वसाधारण.
प्रभाग ७- अ)सर्वसाधारण महिला, ब) सर्वसाधारण.
प्रभाग-८ – अ) सर्वसाधारण महिला, ब)सर्वसाधारण.
प्रभाग ९- अ) सर्वसाधारण महिला, ब)सर्वसाधारण.
प्रभाग १०- अ)सर्वसाधारण महिला, ब)सर्वसाधारण. असे असणार आहे.
तर ग्रामपंचायती च्या स्थापनेपासून बिनविरोध परंपरा असणारी अनगर ग्रामपंचायतीचे नुकतेच नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले आहे. त्या नगरपंचायतीच्या नगरसेवकांच्या आरक्षणाची सोडत नियंत्रण अधिकारी मच्छिंद्र घोलप व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अनुप अग्रवाल यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी लोकसंख्येच्या तुलनेत अनुसूचित जातीची जास्त लोकसंख्या असलेल्या प्रभाग क्रमांक १ मध्ये अनुसूचित जाती महिला व प्रभाग क्रमांक ३ मध्ये अनुसूचित जाती सर्वसाधारण असे चिठ्ठीद्वारे आरक्षण काढण्यात आले. तर प्रभाग क्रमांक २, ४, ५, ८, ९, १२, १६ व १७ या ८ प्रभागांमध्ये सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निघाले. तर प्रभाग क्रमांक ६, ७, १०, ११, १३, १४ व १५ या ७ जागांवर सर्वसाधारण असे आरक्षण निघाले आहे.
अनगर नगरपंचायत साठी आरक्षण प्रभाग क्रमांक १ -अनुसूचित जाती महिला, प्रभाग क्रमांक २-सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ३-अनुसूचित जाती सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक ४- सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ५- सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ६-सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ७- सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ८- सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ९- सर्वसाधारण महिला, प्रभाग १०- सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ११- सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १२-सर्वसाधारण महिला,
प्रभाग क्रमांक १३-सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १४-सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १५-सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक १६-सर्वसाधारण महिला,प्रभाग क्रमांक १७- सर्वसाधारण महिला असे असणार आहे.