भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांचा जागीच मृत्यू..

डॉक्टर दांपत्याचा समावेश, रस्त्यामुळे आणखी किती बळी जाणार?

मोहोळ कडून पंढरपूरकडे भरधाव वेगात निघालेल्या स्कार्पिओ गाडीने समोरून मोहोळ कडे येणाऱ्या सॅलोरा कारला जोराची धडक देऊन झालेल्या अपघातामध्ये सॅलोरा कार मधील मोहोळ येथील दोन डॉक्टर, दोन लहान मुले व इतर दोन अशा एकूण ६ जणांचा जागीच मृत्यू तर तिघे जन गंभीर जखमी झाल्याची घटना मोहोळ पंढरपूर रस्त्यावरील पेनुर हद्दीतील माळी वस्ती जवळ दि. २२ रोजी घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्कार्पिओ गाडी क्रमांक एम.एच. १३, डी.ई.१२४२ ही साडेचार वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात पंढरपूरकडे निघाली होती. त्याच दरम्यान समोरून मोहोळ कडे मोहोळ येथील खान व आतार कुटुंबीय सॅलोरा क्र. एम.एच. १३, डी.टी.८७०१ कार मधून येत होते. पेनुर हद्दीतील माळीवस्ती समोर स्कार्पिओ ने सॅलोरा कारला समोरासमोर जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये सॅलोरा कार मधील डॉ. मुजाहिद इमाम आत्तार (वय ३१), डॉ.आफ्रीन मुजाहिद आत्तार (वय २७), अराफत मुजाहिद आत्तार (वय १०), इरफान नूरखान खान (वय ४०), बेनजीर इरफान खान (वय ३७), इनाया इरफान खान (वय-२ वर्ष), अशा ६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर अरहान इरफान खान (वय १०) हा गंभीर जखमी झाला.

https://youtu.be/UPtpb0mBJGY
व्हिडीओ पहा


 तर स्कार्पिओ गाडीचा चालक अनिल सुभाष हुंडेकरी व त्याच्या सोबत असलेली माहिला मनीषा मोहन हुंडेकरी रा. गादेगाव तालुका पंढरपूर हे दोघेही गंभीर जखमी असून सोलापूर येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत. घटनेची खबर मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुनगे  यांनी घटनास्थळाला भेट देऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने सोलापूरला पाठविले, तर मृतदेह ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. याबाबत रशीद कादर खान यांच्या फिर्यादी जबाबानुसार स्कार्पिओ चालकावरती गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुनगे हे करीत आहेत.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती, पोलीस निरीक्षक अशोक सायकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुनगे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

भीषण अपघातानंतर अपघातस्थळी तात्काळ धाव घेत पेनुर चे माजी सरपंच रमेश माने, उद्योजक समाधान माने, अण्णासाहेब सलगर, बाळासाहेब आढेगावकर, बबलू शेळके, बंटी क्षीरसागर, योगेश गवळी, मानाजी खरात, पप्पू सलगर, तानाजी माळी, बाळासाहेब गवळी यांच्यासह स्थानिक नागरिकांनी जखमींना अपघातग्रस्तांना मदत करीत यासाठी पाठवून दिले.

गेल्या कित्येक वर्षापासून शहरात वैद्यकीय सेवा देणारे खान कुटुंबीयांमधील सहा जणांचा अपघाती मृत्यू होऊन खान व आतार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेने मोहोळ शहरावरही दुखाचे सावट पसरले होते. यांच्या मृत्यूने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.

पालखी महामार्ग ठेकेदार मुळे आणखी किती बळी जाणार?

मोहोळ ते पंढरपूर हा चाळीस किमीचा पालखी महामार्ग  गेल्या वर्षभरापासून मृत्युचा सापळा बनला आहे. या मार्गावरील मोहोळ ते मगरवाडी पाटी या मोहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत या पालखी महामार्गाचे काम ९० टक्के पूर्ण होऊन ही आणखी रोडवर पांढरे पट्टे मारले नाहीत. यासह दिशादर्शक फलक लावले नसल्याने व दोन्ही बाजू चे रस्ते असून ही एकेरी वाहतूक सुरू ठेवल्याने केवळ पालखी महामार्गाच्या ठेकेदारांच्या चुकीमुळे गेल्या वर्षभरात अनेक अपघात अपघात झाले असून त्यात अनेक जणांचा मृत्यु झाला असून अनेक जणांना अपंगत्व प्राप्त झाले आहे. सारोळे पाटी येथे दोन पोलीस बंधू, तसेच पंढरपूर येथील दोन युवकांच्या अपघातातील मृत्यूची घटना ताजी असतानाच एकेरी वाहतुकीमुळे ही ६ जणांच्या मृत्यूची दुर्दैवी घटना घडली असून याला फक्त ठेकेदार जबाबदार आहेत. विषेश म्हणजे अपवाद वगळता या मार्गावरील अपघातप्रणव क्षेत्रात कोठेही दिशा दर्शक अथवा धोका दर्शविणारे फलक नाहीत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *