सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मोहोळ येथील सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी लंबे यांना राज्यस्तरीय “राजमाता जिजाऊ पुरस्कार” जाहीर झाला आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
अविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन, कोल्हापूर यांच्या वतीने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शिक्षण मित्र डी. व्ही गायकवाड प्राथमिक शाळा मोहोळ च्या सहशिक्षिका शुभांगी तुकाराम लंबे यांना राज्यस्तरीय “राजमाता जिजाऊ पुरस्कार” प्राप्त झाला आहे. यासंबंधीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार व सोलापूर जिल्हाध्यक्षा अनुराधा कुलकर्णी यांनी पाठवले आहे. दि.२७ मार्च रोजी सोलापूर येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये लंबे यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
दरम्यान या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष वैभवबापू गुंड पाटील, उपाध्यक्ष संतोष गायकवाड, सचिव सुधीर गायकवाड, मुख्याध्यापिका साधना कोरे, ज्येष्ठ नेते कौशिक तात्या गायकवाड, तालुकाध्यक्ष प्रकाशभाऊ चवरे, माजी सभापती नागेश साठे, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, सोमनाथ पवार, ज्येष्ठ नेते संजय क्षिरसागर,
सचिन गायकवाड, संदीप गायकवाड, रंभादेवी गुंड, विजयश्री गायकवाड, बार्शी चे नागेश अक्कलकोटे, अनिल बनसोडे, अण्णा सुर्वे, मोहन पाटील, सुनील शहा, मीरा माने, अविनाश अडसूळ, अभिजित गायकवाड, यशोदा कांबळे, ज्योत्स्ना पाटील, बालाजी शिंदे, विक्रांत मांडवे आदींनी अभिनंदन केले.