मोहोळ विधानसभेला मनोज शेजवाल यांची उमेदवारी कट रचून कापली. नागेश वनकळसे

सक्षम दलित नेतृत्व तयार होऊ न देणे हा अजेंडा.

२०१९ ला मोहोळ विधानसभा मतदारसंघातुन मनोज शेजवाल यांची उमेदवारी कट रचून कापण्यात आली, विधानसभेला सक्षम दलित नेतृत्व तयार होऊ द्यायचे नाही, असा त्या मागचा अजेंडा होता. त्याचा मीही बळी असून ही निती २००९ पासून मतदारसंघ राखीव झाल्यापासून आखण्यात आली, त्याचा मी जवळून साक्षीदार असून वेळ आली की सगळे उघडे करणार असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट शिवसेनेचे, शिंदे गटाचे समर्थक नागेश वनकळसे यांनी केला.

या बाबत सविस्तर बोलताना नागेश वनकळसे म्हणाले की, मनोज शेजवाल हे २०१४ ला लढलेले असताना त्यांना उमेदवारी देणे क्रमप्राप्त होते, परंतु स्थानिक विरुद्ध गेटकेन असा वाद लावून आयत्या वेळेला त्यांची उमेदवारी कापण्यात आली, स्थानिक असलेले क्षीरसागर यांना उमेदवारी दिली, परंतु ते गेल्या पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनात एकदाही विजय मिळवू शकले नाहीत, हे पक्षाला माहिती असूनही त्यांना परत उमेदवारी दिली. तिथे जिंकण्याची क्षमता होती की आर्थिक गणित त्यामुळे तिथेच शेजवाल यांच्या सारख्या कट्टर शिवसैनिकांचा घात झाला ,माझे आणि मनोज शेजवाल यांचे  मोहोळ विधानसभेला उमेदवारी अर्ज संभ्रम करून ठेवण्यात आले त्यामागे आमचे राजकीय भविष्य संपविणे एकमात्र उद्देश होता असे मत  नागेश वनकळसे यांनी व्यक्त केले.

पुढे बोलताना वनकळसे म्हणाले की, शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री आमदार तानाजीराव सावंत यांची रोखठोक शैली परंतु त्यामागे त्यांचा समोरच्यावर कुटुंबातील सदस्या प्रमाणे टाकण्यात येणाऱ्या विश्वासामुळे त्यांना पक्षाने ही अंधारात ठेवले आणि शेजवाल यांच्या  सारख्या शिवसैनिकाला माणसातून उठविण्याचे काम झाले त्यामुळे येणाऱ्या काळात जुन्या नुकसानीची भरपाई म्हणून मनिष काळजे ,बापू भोसले ,अभय देशमुख या सहित सर्व शिवसैनिक आमदार  तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन नागेश वनकळसे यांनी केले.

मोहोळ विधानसभा, सोलापूर लोकसभा कागदोपत्री अनुसूचित जातीसाठी राखीव असून अनुसूचित जातीतील बहुसंख्य समाजातील एकही व्यक्ती या ठिकाणी प्रतिनिधित्व करत नसून, लढणारा आणि पडणारा यांच्या जातीच्या दाखल्याचे वाद कोर्टात आहेत त्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला समतेसाठी आणि सामाजिक जीवनशैलीत मूळ प्रवाहात येण्यासाठी आरक्षण दिले परंतु इथे नेतृत्व तयार झाले नसल्याची खंत नागेश वनकळसे यांनी व्यक्त केली.

https://youtu.be/sLu7ul0tqTw

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *