तांत्रिक कामगार युनियन प्रणित तांत्रिक ॲप्रेंटीस,कंत्राटी कामगार असोसिएशनची राज्य कार्यकारिणी जाहीर
शिकाऊ उमेदवार व कंत्राटी कामगारांचे तिन्ही कंपनी मध्ये प्रलंबित प्रश्न त्वरीत सोडविण्यात यावे, महावितरण,महापारेषण , महानिर्मिती या तिन्ही वीज कंपनीतील प्रश्न सोडविण्यासाठी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
कंत्राटी कामगारांना शाश्वत रोजगाराची हमी द्यावी, महामारीच्या काळात कंत्राटी कामगारांनी केलेल्या कामांची दखल घेत त्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे, याकरीता विशेष भरती मोहीम राबवावी, कंत्राटी कामगाराकरीता कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात यावी. राज्यशासनाने आश्वासन देत शिकाऊ उमेदवारांना वाढीव 25 टक्के आरक्षण त्वरीत लागू करावे, कंत्राटी कामगारांना रोजंदारी पध्दतीवर घेण्यात यावे, शासन नियमाप्रमाणे महावितरण कंपनीमध्ये सरळ सेवा भरतीमध्ये वयोमर्यादावाढवावी. तिन्ही कंपन्यांमधील तृतिय व चतुर्थ श्रेणीतील रिक्तपदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया त्वरीत राबवावी, मराठा उमेदवारांना निवड यादीप्रमाणे त्वरीत विद्युत सहाय्यकपदी नियुक्ती द्यावी.भारतीय डाक विभागीय योजनेचा फायदा कंत्राटी कामगारांना कंपनीच्या वतीने द्यावा, कंत्राटी कामगार यांना नियमीत कामगारांप्रमाणे विमा संरक्षण कवच देण्यात यावे, कंत्राटी कामगारांचे निधन झाल्यास नियमीत कामगार प्रमाणे अंत विधी करता कंपनी वतीने आर्थिक मदत देण्यात यावी. आदी मागण्या निवेदनाद्वारे केला आहे.अशी माहिती तांत्रिक अप्रेन्टिस व कंत्राटी कामगार असोसिएशन राज्यकार्याध्यक्ष विक्की कावळे यांनी दिली आहे.
तांत्रिक कामगार युनियन(5059)प्रणित तांत्रिक ॲप्रेंटीस,कंत्राटी कामगार असोसिएशनची राज्य कार्यकारिणी जाहीर
शिकाऊ उमेदवार व कंत्राटी कामगारांचे न्याय हक्कासाठी लढणारी ज्वलंत क्रांतिकारी चळवळ म्हणजे तांत्रिक कामगार युनियन प्रणित कंत्राटी कामगार असोसिएशन ची बैठक राज्याध्यक्ष प्रभाकर लहाने, राज्यउपाध्यक्ष नितीन (भैय्या) चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नूतन राज्य कार्यकारणीची निवड करण्यात आली. राज्य कार्याध्यक्ष:- श्री विक्की कावळे , सरचिटणीस:-श्री राहील शेख,उपसरचीटनिस:-श्री प्रताप खंदारे,कोषाध्यक्ष:-श्री अतुल पाटील,राज्य उपाध्यक्ष:-श्री दत्तात्रेय धायगुडे, संघटक सचिव:- प्रमोद भालेराव.. सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे एक मतांनी निवड झाली असून सर्व कामगारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.