मोहोळ/धुरंधर टीम
घाटणे (ता. मोहोळ) येथील राजेशाही प्रतिष्ठान च्या वतीने दिवाळीनिमित्त गरजू ५० कुटुंबांना प्रत्येकी पाच किलो साखर व पाच किलो तांदूळ मोफत देण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे.
घाटणे येथील राजेशाही प्रतिष्ठान च्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले जाते. याच पाश्वभूमीवर दिवाळी च्या निमित्ताने गरजू ५० कुटुंबांना प्रत्येकी पाच किलो साखर व पाच किलो तांदूळ मोफत देण्यात आले.
यावेळी सचिन शिराळ, पोलिस पाटील महेश वायचळ, तंटामुक्त अध्यक्ष विश्वास गायकवाड, बाळासाहेब देशमुख, मल्लिकार्जुन कारंडे, विकास गायकवाड, कुंडलिक गायकवाड, तानाजी गायकवाड, कचरू बनसोडे, लक्ष्मण बनसोडे, गोविंदराव देशमुख, सौदागर गायकवाड, विजय पवार, अनिल गायकवाड, सिद्धनाथ मशनरी चे कृष्णदेव गायकवाड, अंकुश देशमुख, शशिकांत सावंत, खेलु माने, प्रमोद सावंत, अंकुश देशमुख, शरद देशमुख, किशोर देशमुख आदिंसह मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.