रफिक शेख यांना ‘ राज्यस्तरीय साहित्यरत्न गुणगौरव पुरस्कार प्रदान

पंढरपूर/धुरंधर न्यूज

साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्त राज्यस्तरीय साहित्यरत गुणगौरव पुरस्कार पेनूर (ता. मोहोळ) येथील व राहुल गांधी माध्यमिक विद्यालय कोर्टीचे सहशिक्षक रफिक अब्दुलगनी शेख यांना प्रदान करण्यात आला.

अर्जुनसोंड (ता. पंढरपूर) येथील साहित्य अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तीला साहित्यरत्न गुणगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. याच पार्श्वभूमीवर यावर्षी पेनूर (ता. मोहोळ) येथील व राहुल गांधी माध्यमिक विद्यालय कोर्टीचे सहशिक्षक तथा पेनूर येथील रफिक अब्दुलगनी शेख यांना सुनिल वाघमारे (वंचित बहुजन आघाडी राज्य उपाध्यक्ष), सचिन कांबळे (पत्रकार) नानासाहेब वाघमारे (दलित मित्र पुरस्कार विजेते), समाधान वायदंडे ( लसंस्थापक अध्यक्ष , लहुजी वस्ताद ग्रुप अजनसोंड) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

https://youtu.be/sLu7ul0tqTw


दरम्यान या पुरस्काराबद्दल शांतिनिकेतन गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय कोंडलकर, सचिवा मंगलताई कोंडलकर, मुख्याध्यापक, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पेनूर ग्रामस्थानी त्यांचे कौतुक केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *