“श्रीमंती मोहोळची” पुस्तकाला सहकार्य करणार
सोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्यां “श्रीमंती सोलापूरची” पुरस्कारासाठी सामाजिक कार्याची दखल घेऊन दिले जाणारे पुरस्कार आदर्शवत बाब असून यामुळे आणखी काम करायला ऊर्जा मिळते. सोलापूर सोशल फाउंडेशन तर्फे प्रकाशित करण्यात येणाऱ्या “श्रीमंती मोहोळची” या पुस्तकाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन मोहोळचे तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी दिले.
मोहोळ तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पाच व्यक्तीना “श्रीमंती सोलापूरची” पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून यामध्ये बोलवाडी प्रकल्पाचे प्रणेते जयप्रदा व योगेशकुमार भांगे, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर शितोळे, राष्ट्रीय खेळाडू केतकी शिंदे, संतोष नीळ आणि वृक्षमित्र सुदाम वसेकर यांना दि.५ ऑगस्ट रोजी या पुरस्काराचे वितरण तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी पोलीस निरीक्षक अशोक सायकर, संभाजीराव गरड महाविद्यालयचे सचिव प्रतापसिंह गरड, निवृत्त कृषी अधिकारी प्रदीप काकडे, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, माजी तालुकाध्यक्ष सतीश काळे, ज्येष्ठ नेते पद्माकर देशमुख, सुरेश राऊत, समन्वयक विजय पाटील, सल्लागार शहाजी देशमुख, श्रीकांत शिवपूजे, नामदेव पवार, लवांड, आदि उपस्थित होते. प्रास्ताविक शहाजी देशमुख यांनी तर सूत्रसंचालन राजाराम बाबर यांनी केले.