आष्टीच्या छकुलीला प्रहार देणार घर बांधून, झोपडीत जाऊन केली मदत..

मरीआईवाले समाजाची कलाकार पोहचली कान्स महोत्सवात

कुरुल /नानासाहेब ननवरे

यंदाच्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झालेल्या ‘पोटरा’ या चित्रपटातील आष्टी (ता. मोहोळ) येथील कलाकार छकुली देवकर हिच्या घरच्या बिकट आणि हलाखीच्या परिस्थितीची व ओढ्याच्या कडेला झोपडीत राहत असल्याची माहिती कळताच तिला घर बांधून मदतीचा एक हात देण्याचा निर्णय प्रहार जनशक्ती पक्षाने घेतला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आष्टी या गावची रहिवाशी असलेल्या छकुलीच्या घरची परिस्थिती अतिशय बिकट आणि हलाखीची आहे. तिच्या कुटुंबियांना राहण्यास स्वत:चे घर नसून गावातील एका फाटक्या झोपडीत छकुली आई-वडिलांसह वास्तव्यास आहे. तिचे वडील आजारी असून ते अंथरुणावर पडून असतात आणि आई मोलमजुरी करते, ही माहिती कळताच प्रहार चे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील, शहराध्यक्ष अजितभाऊ कुलकर्णी, शहर कार्याध्यक्ष खालिदभाई मणियार, मोहोळ तालुका संपर्कप्रमुख नानासाहेब खांडेकर यांच्या टीमने तिथे जाऊन या छकुलीला तात्काळ स्वरूपात मदत करत लवकरच जागा उपलब्ध करून घर बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे.

फ्रान्समध्ये दि.१७ ते २८ मे दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सोलापूर जिल्ह्यात तयार झालेल्या पोटरा या चित्रपटाची निवड झालेली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक शंकर धोत्रे यांनी केले आहे. चित्रपटाचे निर्माते शरद शिंगाडे महाराज असून चित्रपटाचे चित्रीकरण सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, मंगळवेढा व मोहोळ तालुक्यात झाले आहे.

सध्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता अनेक राजकारणी मंडळी भोंगा, हनुमान चालीसा या राजकारणात व्यस्त असताना मात्र नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्ष मात्र सामाजिक कार्यात अग्रेसर असून अत्यंत हलाखीचे जीवन जगत ही छकुली देवकर स्वतःच आयुष्य झगडत त्यातून मार्ग काढत पुढे वाटचाल करत असल्याने या तडफदार मुलीला प्रहारच्या माध्यमातून एक हात मदतीचा देण्यात आला आहे.

यावेळी दक्षिण चे तालुकाध्यक्ष सिध्दु काळे, संपर्कप्रमुख नानासाहेब खांडेकर, मंद्रुप शहराध्यक्ष उस्मानभाई नदाफ, युवा अध्यक्ष तायाप्पा कोळी, प्रसिध्दीप्रमुख नानासाहेब ननवरे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *