
मोहोळ/धुरंदर न्यूज
टाकळी सिकंदर मधील भीमा कारखाना ते तिर्हे मार्ग रोड चौकामधील अतिक्रमण हटवावे, यासह चौकामधील गेल्या अनेक वर्षापासून महापुरुषांच्या जयंती तसेच सामाजिक उपक्रमासाठी असलेल्या झेंड्याचा कट्टा व ध्वज शेजारी मारलेल्या पत्रा शेडमुळे भीम अनुयायांची मने दुखावली असून सदरील अतिक्रमण तात्काळ काढावे अन्यथा २० ऑक्टोबर रोजी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष कृष्णाजी गायकवाड यांनी दिला आहे.
याबाबत पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर चौकामध्ये सन १९९८ सालापासून त्या ठिकाणी सार्वजनिक रित्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्ध जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती आदिसह महापुरुषांच्या जयंती साजरी केल्या जातात, या ठिकाणी अनेक समाज प्रबोधन असे कार्यक्रम बैठका होत असतात. सर्व जाती-जमातीतील लोक एकत्रित कार्यक्रम घेऊन पूर्वीपासून झेंड्याचा कट्टा व ध्वज तयार आहे, मात्र त्या कट्ट्याभोवती चिटकून पत्रा शेड मारण्यात आलेला असून त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी निर्माण झाली आहे, परिणामी भिम अनुयायांची मने दुखावली आहेत. सदरील अडचण निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करून त्याने मारलेले शेड तात्काळ काढण्यात यावे, अन्यथा टाकळी सिकंदर चौकामध्ये २० ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता भव्य रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनावर जिल्हाध्यक्ष कृष्णाजी गायकवाड, भारत कदम, रावसाहेब गायकवाड, अशोक गायकवाड, सुनील कदम आदींच्या साह्या आहेत.