भैय्या देशमुखांना अखेर जामीन मंजूर..

कांदा भाव प्रकरण भोवले होते.

मोहोळ, धुरांधर न्यूज

सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले असताना नियोजन भवनात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांशी धक्काबुक्की करुन शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी अटकेत असलेले जनहीत शेतकरी संघटनेचे प्रभाकर उर्फ भैय्या देशमुख यांच्यासह ७ जणांच्या जामीन अर्जाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश मिलींद भोसले यांच्यासमोर होऊन न्यायाधीशांनी सर्व ७ आरोपींची जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले असून आज बुधवारी ते जेलबाहेर येतील.

पालकमंत्री नियोजन भवनात बैठकीसाठी आलेले असताना कांद्याच्या पडलेल्या भावा बाबत निवेदन देण्यासाठी जनहित शेतकरी संघटनेचे भैय्यासाहेब देशमुख हे कार्यकर्त्या समवेत गेले होते. त्यावेळी पोलिसांनी शांततेच्या मार्गाने निवेदन देण्याबाबत आवाहन केलेले असताना देखील भैय्या देशमुख, किशोर दत्तु, ज्ञानेश्वर पवार, अंकुश वाघमारे, बजरंग शेंडेकर, मोहन दत्तु, सोमनाथ लिगाडे यांनी मोठमोठयाने घोषणाबाजी करत पालकमंत्री घेत असलेल्या बैठकीत घुसण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना मज्जाव केला असता त्यांनी पोलिसांशी धक्काबुक्की केली व यात पोलिस जखमी झाले तसेच पालकमंत्री यांना कांद्याचा हार घालुन शाई टाकुन अपमानीत करण्याच्या उद्देशाने शाई व कांद्याचा हार जवळ बाळगला अशा आशयाची फिर्याद पोलीस सागर सरतापे यांनी सदर बझार पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती. या प्रकरणी प्रभाकर देशमुख यांचेसह ७ जणांना अटक झालेली होती. जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपीचे वकील ॲड. जयदीप माने यांनी, कांद्याच्या पडलेल्या भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी शेतकरी संघटनेतर्फे केलेल्या चळवळीला दाबण्यासाठी आरोपींना या प्रकरणात गुंतवले असल्याचा युक्तिवाद केल्याने देशमुख यांना जामीन मिळाला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *