भिम टायगर सेनेची मागणी
मोहोळ/धुरंदर न्यूज
हारेगाव ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर येथील जातियवादी गुंडांनी अमानुषपणे मारहाण केल्याबद्दल सदर व्यक्तींविरुध्द योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी भीम टायगर सेनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष लखन घाटे यांनी केली आहे.
याबाबत भीम टायगर वतीने प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मौजे हारेगाव ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर या ठिकाणी तरुण दलित युवकास कबुतर चोरीच्या संशयावरुन त्या गावातील स्वतःला सवर्ण समजणाऱ्या जातीयवादी गाव गुंडांनी अमानुषपणे त्यास झाडाला उलटं लटकवून मारहाण करण्यात आली, अशा प्रकारे सदर गांव गुंडांनी अमानवीय कृत्य करुन सदर युवकास अमानुषपणे मारहाण केली. सदर घटनेमुळे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सदर घटनेबाबत आम्ही तीव्र जाहिर निषेध करतो व सदर घटनेतील संबधित गाव गुंडांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही लवकरात लवकर करावी अन्यथा आमच्या संघटनेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रात जलआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा निवेदना द्वारे भीम टायगर सेनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष लखन घाटे यांनी दिला आहे.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नामदेव शिंदे, उत्तर सोलापूर भीम टायगर सेनेचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड आदि उपस्थित होते.