गोटेवाडी येथील कोकरे यांच्या शेतातील घटना.
मोहोळ/धुरंदर न्यूज
गोटेवाडी ते बाभूळगाव जाणारी महावितरण कंपनीची मेन लाईनला शॉर्टसर्किट होऊन स्पार्क झाल्याने बाबुराव भुजंगा कोकरे यांच्या शेतातील ऊस जळून खाक झाला असून यामध्ये शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मोहोळ तालुक्यातील गोटेवाडी येथील शेती गट नंबर २३६/३ मध्ये बाबुराव भुजंगा कोकरे यांचे ऊस क्षेत्र आहे. त्यांच्या शेतामधून महावितरण कंपनीची गोटेवाडी ते बाभूळगाव जाणारी एम एस ई बी ची मेन लाईन आहे. दरम्यान दि .२५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता च्या दरम्यान मेन लाईन मधून शॉर्टसर्किट होऊन स्पार्क झालेने कोकरे यांच्या शेतातील ऊसाला आग लागली. शेजारील सागर कोकरे, सचिन कोकरे, पृथ्वीराज कोकरे यांनी वेळीच मदत केल्याने आग आटोक्यात येण्यास मदत झाली असून झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी कोकरे यांनी केली असून या घटनेची खबर मोहोळ पोलिसांत दिली आहे.