पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करावेत..

४ शेळ्या व १बोकड व मिल्कीग मशिन योजना

मोहोळ/ धुरंधर न्युज

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभाग कडील सन २०२३-२०२४ वर्षा मध्ये जिल्हा परिषद उपकर योजनेमधून  वैयक्तीक लाभाच्या  योजना राबविण्यात येतात. यासाठी पात्र  लाभार्थींनी 25 सप्टेंबर 2023 पर्यंत  अर्ज करण्याचे आवाहन पशुधन विकास अधिकारी विस्तार पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पी. बी रणवरे यांनी केले आहे. 

आर्थिक दृष्टया मागासलेल्या शेतमजुर व शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर ४ शेळ्या व १ बोकड वाटप करणे, ५० टक्के अनुदानावर पशुपालकांना मिल्कीग मशिन पुरवणे या योजनांसाठी पात्र लाभार्थीं कडुन अर्ज मागविण्यात येत असून सदर अर्ज दि. २५ ऑगस्ट २०२३ पासुन पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती तसेच पशुवैद्यकिय  दवाखान्यामध्ये उपलब्ध असणार आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या संकेत स्थळावर ( www.zpsolapur) उपलब्ध आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख २५ सप्टेंबर २०२३ आहे. तरी इच्छुक पात्र लाभार्थीनी वरील योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एल. एल. नरळे, गटविकास अधिकारी आनंद मिरगणे यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *