या शिबिरांचा लाभ घेण्याचे लाईफ केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि आयसीयू तर्फे आवाहन
मोहोळ, धुरंधर न्यूज
मोहोळ येथील नागरिकांच्या सोयीसाठी लाइफ केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि आयसीयू यांच्या वतीने मोफत भव्य स्त्रीरोग शिबिर, मोफत वंध्यत्व निवारण शिबिर तसेच सवलतीच्या दरात दुर्बिणी द्वारे शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन आज रविवारी दि. २० ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजताच्या दरम्यान आयोजित करण्यात आले असून या आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. चेतन आयवळे, डॉ मनोज देवकते, डॉ मिलिंद लामगुंडे, डॉ. शैलेश झाडबुके, डॉ. सागर फाटे, डॉ. अमोल हराळे, डॉ. सुनील लवटे, डॉ. वसीम शेख, डॉ. अमोल लांडे, एच.आर मॅनेजर दादासाहेब गायकवाड यांनी केले आहे.
मोहोळ शहरांमध्ये सर्व सोयीनियुक्त सज्ज असलेल्या लाईफ केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि आयसीयु तर्फे वेळोवेळी विविध मोफत शिबिरांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये आज रविवारी दि.२० ऑगस्ट रोजी तज्ञ डॉ. कर्मजीत डोंगरे, डॉ. अभिजीत पाटील व डॉ. आकाश जाधव यांच्या उपस्थितीमध्ये प्रसूती पूर्व व प्रसुती पश्चात असलेल्या विविध तक्रारीबाबत मोफत भव्य स्त्रीरोग शिबिर व गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यासह यावेळी सवलतीच्या दरात दुर्बनीद्वारे शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले असून यामध्ये दुर्बीण द्वारे गर्भ पिशवी काढणे, दुर्बिणीद्वारे वंध्यत्व तपासणी, गाठी काढणे, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, दुर्बिणी द्वारे गर्भ नळीतील गर्भाची शस्त्रक्रिया करण्यात येणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन तज्ञ डॉक्टर यांनी केली आहे.