महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा मार्फत केला गौरव..
मोहोळ/धुरंधर न्यूज
नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर आषाढी यात्रा २०२३ मध्ये आरोग्य विभागात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा १०८ मार्फत कोन्हेरी ता. मोहोळ येथील नितीन सुभाष जरग यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठी यात्रा म्हणून पंढरपूर आषाढी वारी कडे पाहिले जाते. यात आरोग्य विभागाकडे काम जोखमीचे असते तर रुग्णांना तात्काळ सेवा देण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा १०८ मध्ये कोन्हेरी ता. मोहोळ येथील नितीन सुभाष जरग यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्या सहीने प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. दरम्यान जरग यांच्या या गौरवाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.