नागरिकांनीनिवेनाद्वारेकेलीमागणी
मोहोळ/धुरंधर न्युज
मोहोळ नगरपरिषद मार्फत तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग ते ढोकबाभूळगाव हा रस्ता २४ मीटर इतका आराखड्यात असुन या रस्त्यामध्ये शासकीय वेअर हाऊस जवळ घरकुल योजनेमधील घरे जाणार असल्याने सर्व गरीब व मोल मजुरी करणाऱ्या लोकांना बेघर होण्यापासून वाचवण्यासाठी तो ९ मीटरचा करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
मोहोळ नगरपरिषद प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोहोळ नगरपरिषद विकास आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये मोहोळ राष्ट्रीय महामार्ग ते ढोक बाभूळगाव रस्ता २४ मीटर इतका असून यामधील गट नंबर ७४३/१ ब/२ ब शासकीय वेअर हाऊस जवळ सन २००० मध्ये शासनाने घरकुल योजना राबवून बेघरांना घरे दिलेली आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ता रुंदीकरणामुळे घरे निघणार आहेत. संबंधित घर मालकांना या व्यतिरिक्त कोणतीही जागा नसल्याने सर्व गरीब व मोलमजुरी करून खाणाऱ्या गरीब जनतेला पुन्हा बेघर व्हावे लागणार आहे, परिणामी प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग ते शासकीय वेअर हाऊस इथे पर्यंत सदरील रस्ता ९ मीटरचा करावा व त्यापुढे २४ मीटरचा करून या गरीब लोकांना बेघर होण्यापासून वाचवावे, अन्यथा मोहोळ नगर परिषदेवर हलगी मोर्चा काढण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते ऍड. विनोद कांबळे, जावेद मुलांनी, दिपक तलारी, प्रशांत कांबळे, गणेश अष्टूळ, शिवाजी अलकुंटे, सोहेल पठाण, सलीम मुलानी, सायरा शेख, लक्ष्मी अलकुंटे, शोभा सोलंकर, बेबी आतार, जमिला पठाण, नागर तलारी आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.